Sat, May 25, 2019 22:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लील चाळे

भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लील चाळे

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 2:08AM

बुकमार्क करा

नालासोपारा : प्रतिनिधी

भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लिल चाळे करणार्‍या नालासोपारा येथील भोंदूबाबा रमेश यादव ऊर्फ अवगड बाबा याला तुळींज पोलिसांनी अटक केली. घटनास्थळावरून पूजेचे साहित्य, गंगाजल, दोरे जप्त करण्यात आले आहेत. या भोंदूबाबाने आणखी किती महिलांना फसवले याबाबत पोलीस आता तपास करीत आहेत.

मुंबईतील चेंबूूर परिसरात राहणार्‍या एका महिलेला  मुलगा घरात व्यवस्थित राहत नसल्याने त्याला भूतबाधा झाली असावी, असा संशय होता. यामुळे ती जावयाच्या ओळखीने नालासोपारा येथील रमेश यादव ऊर्फ अवगड बाबा याच्याकडे  विचारपूस करण्यासाठी 5 जानेवारी 2015 गेली होती. यावेळी बाबाने या महिलेला अंगात भूत असल्याचे सांगून ते काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने तिथे उपस्थित सर्वांसमोर तिच्या डोक्यावर दोन लिंबू कापले.

उतारा काढावा लागेल म्हणून या बाबाने तिला एका खोलीत नेवून अश्‍लील चाळे केले. एवढेच नाही, तर त्याने धाक दाखवून अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करत महिलेने पळ काढला व जेथे तिची बहिण होती तिथे पोहोचून झालेला प्रकार सांगितला. मात्र बहिणीने आपली बदनामी होईल, या भीतीने कोणाला काही सांगू नको असे सांगितले. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरुच असल्याने अखेर या महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रमेश यादव उर्फ अवगड भोंदू बाबाला अटक केली.