Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आघाडीच्या बैठकीत

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आघाडीच्या बैठकीत

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:48AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांची त्यांची बीडच्या घरी भेट घेतल्याने जयदत्त क्षीरसागर भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मात्र, विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला ते हजर होते.

आपले पंख छाटून राष्ट्रवादीने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बळ दिल्याने क्षीरसागर नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केली होती. नुकताच मुख्यमंत्र्यांचा बीड जिल्ह्याचा दौरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागर यांच्या घरी पाहुणचार घेतला होता. त्यावरुन चर्चा रंगली होती. 

विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी आघाडीच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. त्यात क्षीरसागर बसले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच असल्याचे स्पष्ट झाले.