Tue, Apr 23, 2019 22:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच घेताना मुंब्य्रात अटक 

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच घेताना मुंब्य्रात अटक 

Published On: Apr 27 2018 1:17AM | Last Updated: Apr 27 2018 1:16AMठाणे : वार्ताहर 

मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता सातपुते (53) यांना गुरुवारी एका बिल्डरकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ठाणे एसीबीच्या उपअधीक्षक अंजली आंधळे यांनी ही कारवाई केली. 

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्या अंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथील एका बिल्डरविरोधात सातपुते यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. बिल्डरचे बांधकाम बंद करण्यासंदर्भात ही तक्रार करण्यात आली होती. 

या तक्रार अर्जाचा पाठपुरावा न करण्यासाठी सातपुते यांनी बिल्डर कडून 50 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती हा व्यवहार 45 हजारांत ठरला होता. या प्रकरणी संबंधित बिल्डराने ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणीत सातपुते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. 

Tags : Mumbai, Mumbra, NCP corporator arrested, accepting bribe, Mumbai news,