Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प. महाराष्ट्रात उद्यापासून राष्ट्रवादीचा हल्लाबोल

प. महाराष्ट्रात उद्यापासून राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन पुकारले असून हे आंदोलन आता पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात 2 एप्रिलला कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन होणार आहे.

डिसेंबर 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-सेना सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भात 156 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र सभा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रात पार पडला होता. आता हे आंदोलन पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. हल्लाबोल आंदोलनाची पहिली सभा सकाळी 10 वाजता कोल्हापूरच्या मुरगुड येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता भुदरगड, तर सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर येथील दसरा चौकमध्ये सभा होणार आहे. 3 एप्रिलला सकाळी 10 वाजता नेसरी, सायंकाळी 6 वाजता जयसिंगपूर, 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आटपाडी, दुपारी 3 वाजता जत, सायंकाळी 6 वाजता मिरज, सायंकाळी 7 वाजता सांगली, दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता तासगाव, सायंकाळी 5 वाजता शिराळा, सायंकाळी 7.30 वाजता इस्लामपूर, दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महुद,  सायंकाळी 4 वाजता मोहोळ, सायंकाळी 7 वाजता सोलापूर, दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता टेंभुर्णी, सायंकाळी 5 वाजता वैराग, रात्री 8 वाजता कुर्डुवाडी, दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दहिवडी, दुपारी 3 वाजता कोरेगाव, सायंकाळी 6.30 वाजता सातारा, दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पाटण, दुपारी 3 वाजता कराड-उंब्रज, सायंकाळी 6.30 वाजता वाई, दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिरुर, दुपारी 3 वाजता जुन्नर, सायंकाळी 5 वाजता खेड, सायंकाळी 7.30 वाजता भोसरी, दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मावळ, दुपारी 3 वाजता खडकवासला, सायंकाळी 7 वाजता चिंचवड, दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दौंड, सायंकाळी 4 वाजता पुरंदर, सायंकाळी 7.30 वाजता वडगाव शेरी आदी ठिकाणी आंदोलनाच्या सभा होणार आहेत.

या हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सामील होणार आहेत.

Tags : West Maharashtra, NCPs Attackball movement, tomorrow, mumbai news 


  •