Fri, Nov 16, 2018 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसने आघाडीचा निर्णय लवकर घ्यावा!

काँग्रेसने आघाडीचा निर्णय लवकर घ्यावा!

Published On: Apr 13 2018 1:34AM | Last Updated: Apr 13 2018 1:22AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबतचा निर्णय करण्यास विलंब लावू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते डी.पी.त्रिपाठी यांनी काँग्रेसला दिला आहे. 

आघाडी करण्यास राष्ट्रवादी अनुकूल असून त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करणार नाही, असे सांगत त्रिपाठी यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी राष्ट्रवादी प्रचारात उतरेल, असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्रिपाठी म्हणाले, केंद्रातील सत्तेविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप आहे. सत्ताधारी लोकशाही परंपरेनुसार कारभार करत नाहीत. राष्ट्रीय शांतता व सलोखा संकटात असल्यामुळे मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहीजे, असे सर्वच पक्षांचे मत आहे.

Tags : Mumbai, NCP national leader, DP Tripati, Mumbai news,