Wed, Jul 17, 2019 08:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर राष्ट्रवादीची निदर्शने (Video)

चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर राष्ट्रवादीची निदर्शने (Video)

Published On: Jan 22 2018 6:42PM | Last Updated: Jan 22 2018 6:54PMमुंबई :  प्रतिनिधी

कानडीतून भाषण आणि गाणेही गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  मंत्रालयासमोरच्या बंगल्याबाहेर निदर्शने केली.

गोकाक तालुक्यातील तवर या गावात दुर्गादेवी मंदीराच्या उद्घाटन महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले होते. या उद्घाटन समांरभात बोलताना महसूल मंत्री पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरूवात कन्नड गीताने केली.  ‘हुट्टीदरे कन्‍नड नाडे हुट्ट बेकु’ अर्थात ‘जन्म झाला तर कन्‍नड भूमीतच व्हावा’ हे कन्‍नड गीत सीमाप्रश्‍नाचे समन्वयक मंत्री आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गायले आणि सीमावासीयांचा रोष ओढवून घेतला. 

कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असतानाच चंद्रकात पाटील यांनी कर्नाटकाची ओवी गावून  सीमावासीयांच्या सोबतच अखंड महाराष्ट्राचा रोष पत्करून घेतला आहे. याच पार्श्वभूमी वर विरोधी पक्षांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर राष्ट्रवादीने मुंबई येथील त्यांच्या घरासमोर आज निदर्शने केली. 

 

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटील गायले कर्नाटक स्तुती गीत; सीमाभागात संताप (Video)

कन्नड भाषिक गाव असल्यामुळेच कन्नड बोललो : चंद्रकांत पाटील 

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात टीकेची झोड