Sat, Apr 20, 2019 15:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव : भुजबळ

आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव : भुजबळ

Published On: Jul 21 2018 3:27PM | Last Updated: Jul 21 2018 3:48PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना सर्वाना एकत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला. 

राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रावादीच्या वर्धापन दिनाला जोरदार भाषण केले होते. या भाषणातून आपण अजून संपलेलो नाही, आभी हम बचे भी हैं और लढेंगे भी असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीच्या मुंबईतील मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित केले.  जामीनावर बाहेर आल्यावर दुसऱ्यांदाच ते जाहीर कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी त्यांनी सरकार आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नात आहे. लोकांना तुम्ही एकदा फसवू शकता वारंवार फसवू शकत नाही असा टोला लगावला. तसेच ओबीसी समाजाने इतर समाजातील लोकांनाही बरोबर घेऊन जायला हवे तरच ते आपल्याबरोबर येतील असे वक्तव्य केले.

 Update : 

वारंवार लोकांना फसवू शकत नाही 

सगळ्यांना बरोबर घेऊन चला आपलाच उमेदवार निवडून येईल 

मुंबईतील रस्त्यावरील खड्यावरुन भुजबळांची माहापालिकेवर टीका 

ओबीसी समाजाने इतर जातींनाही बरोबर घेऊन पुढे जावे 

आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव 

राष्ट्रवादीचे मुंबईतील मार्गदर्शन शिबिरात छगन भुजबळांचे भाषण सुरु