होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांना अटक 

राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांना अटक 

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:12AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

कळवा परिसरात घराचे अतिरिक्त बांधकाम केल्याच्या कारणावरून घरमालक महिलेच्या घरात शिरुन धमकावल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांना शनिवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. साळवी यांच्या साथीदारानाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा पूर्वेला राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांकडून पोलिसात तक्रारी केल्या जात आहेत. कळवा परिसरातील एका महिलेने आपल्या घराच्या वर माळा बांधण्यास सुरवात केली असता साळवी यांनी तेथे जाऊन त्या महिलेला धमकावले. तसेच त्यांनी आणि साथीदारांनी सदरचे बांधकाम तोडण्याची धमकी दिल्याने महिलेने कळवा पोलिसांकडे  तक्रार केली. त्यानुसार,कळवा पोलिसांनी नगरसेवक साळवी यांच्यावर भादवि कलम 452,427,504,506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.