Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘संविधान बचाव’; राष्ट्रवादीचा भाजपवर ‘पोस्टरहल्ला’

संविधान बचाव; राष्ट्रवादीचा भाजपवर ‘पोस्टर’हल्ला

Published On: Jun 17 2018 11:30AM | Last Updated: Jun 17 2018 11:35AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ‘संविधान बचाव मोहीम’ आयोजित केली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या मोहीमेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या काही नेत्यांविरोधात पोस्टरबाजीही केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर सुरू असलेल्या या मोहीमेत सहभागी होण्याचे अवाहन केले आहे.

‘संविधान बचाव’ ही मोहीम काँग्रेसने सुरू केली होती. आता त्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसनेही सहभाग घेतला आहे. या मोहीमेअंतर्गत भाजपचे प्रदेशआध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार पूनम महाजन आणि केंद्रिय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 

‘संविधान बचाव’साठी या नेत्यांवर साधला निशाणा

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असे ते म्हणाले होते.

‘निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करणारे सत्ताधारी लोकशाहीला घातक आहेत’ 

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी भाजप राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आली असल्याचं वक्तव्य केले होते. ‘राज्यघटनेनं आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला. पण याच राज्यघटनेत अनेकवेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. आम्ही देखील याच दुरुस्त्या करण्यासाठी सत्तेत आलो आहोत, असे ते म्हणाले होते. 

अनंत कुमार यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने घटनेत फेरफार करण्याची भाषा करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवायलाच हवा’ असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मोहीमेत करण्यात आले. 

‘आपल्या धर्मनिरपेक्ष घटनेत फेरफार करण्याची भाषा करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवायलाच हवा‘

 

खासदार पूनम महाजन

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकरी आणि शेतमजूरांच्या मोर्चाला शहरी माओवादाचे लेबल लावल्याप्रकरणी खासदार पूनम महाजन यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. किसान मोर्चात नक्षलवाद डोकावत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. 

‘अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा, मोर्चे काढण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करणारे सरकार पायउतार झालेच पाहिजे’