Fri, Jul 19, 2019 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या

राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या

Published On: Sep 05 2018 3:15PM | Last Updated: Sep 05 2018 3:57PMमुंबई : प्रतिनिधी

भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात आज मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विदया चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी करत राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी चांगलाच इंगा दाखवला.

भाजप आमदार राम कदम यांचे ‘रावण’ कदम असे नामकरण राष्ट्रवादीने केले. त्यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलिस केस दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनामध्ये आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनिषा तुपे, जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियन, डॉ.सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ.रिना मोकल, स्वाती माने आदींसह असंख्य महिला, युवती सहभागी झाल्या होत्या.