Tue, May 21, 2019 04:46



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हे देवा तू कुठे आहेस? कुठे गायब झालास ?; जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ व्हायरल

हे देवा तू कुठे आहेस? कुठे गायब झालास ?; जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ व्हायरल

Published On: Apr 19 2018 1:06PM | Last Updated: Apr 19 2018 1:06PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कठुआ आणि उन्नावमधील सामूहिक बलात्काराचे प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक आंदोलने आणि मोर्चे काढून या दोन्ही घटनांतील मुलींना न्याय मिळावा यासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. पण, जितेंद्र आव्हाडांनी देवालाच काही प्रश्न विचारले आहेत. मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना पवित्र मानलं जात.पण अशाच एका मंदिरात एका निष्पाप मुलीवर अत्याचर झाला तरी देव गप्प बसला? असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहे.

‘हे देवा तू कुठे आहेस? कुठे गायब झालास ? तुला माहीती आहे का काय झालं काश्मीरच्या कठुआमधील तुझ्या मंदिरात ८ वर्षाच्या माझ्या मुलीवर या देशाच्या मुलीवर बलात्कार झाला. देवा तिला मदत करायलाही तु तिथे नव्हतास. अरे असं म्हणतात की प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तुझ्यात प्राण येतो. तु जिवंत होतोस. अरे तु जिवंत असून पण ती पोरगी तुझ्यासमोर मेली?, असा संताप आव्हाड यंनी व्यक्त केला. 

या देशातल्या अनेक आया आमच्या भगिनी वर्षानुवर्षे तुझी पूजा करतात तुझ्यासाठी उपवास करतात आणि असं म्हणतात की संटकसमयी तुच त्यांचं रक्षण करतोस. मग तुला त्या मुलीवरचं संकट दिसल नाही का? अरे आठ दिवस तिच्यावर बलात्कार सुरू होता. आठ दिवस तुझाच पुजारी तिच्यावर बलात्कार करत होता. इतकचं नाही तर त्या नराधमांनी त्यांच्या नातेवाईकांनाही वासना क्षमवण्यासाठी बोलावून घेतले. ते ही आले. देवा तू तिला नाही वाचवू शकलास.

देवा तिची चूक काय ? ती कुठे कमी पडली तुझ्या सेवेमध्ये ? देव नाही की काय असा प्रश्न पडतोय मला ? देवा ती गेली. तुझं मंदिर बदनाम झालं रे. माणुसकीच दिसेनाशी झालीय. एकीकडे तुझ्या मंदिरात बलात्कार होतोय तर दुसरीकडे लोकशाहीच्या मंदिराचे रक्षकच म्हणून आम्ही ज्यांना पाहतो ते बलात्कार करतात. पोरगी हिंमतीने पोलिस ठाणे गाठते पण दुसऱ्या दिवशी बापाचा मृतदेहच तिच्या हाती येतो, अशी खंतही आव्हाडांनी व्यक्त केली.  

उन्नावमध्ये बाप गेल्याचं तर कठुआमध्ये पोरगी गेल्याचं दु:ख, दुख: सारखंच आहे. पण, देवा काय चाललंय रे. कुठेय ती दुर्गा. दुर्गा म्हणजे रणरागिणी. दानवाला पायाशी घेणारी दुर्गा आहे तरी कुठे. ती दिसायला हवी आता तरी. सपना असो वा आसिफा दोन्हीही आमच्याच पोटच्या पोरी आहेत. असहिष्णुतेने सहिष्णुतेचा बळी घेतलाय रे देवा. आता ते दिसतच नाही आम्ही सहिष्णू आहोत याचा किती मोठा अभिमान होता आम्हाला पण आता काही नाही रे देवा,असे मत आव्हाडांनी व्यक्त केले. 

‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणणारा आमचा धर्म होता. याची काळजी कोणाला आहे? ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’, घोषणा देणारे लोक आता दिसेनासे झालेत.  बलात्कार आणि अत्याचार होऊन अनेक दिवस झाले पण, प्रतिक्रीया कोणाच्याच नाहीत. आम्ही चर्चा वेगळ्याच करतो आम्ही दिशाच बदलून टाकतो. हा देश सावित्रीचा, रमाईचा, आहिल्याचा आणि इंदिरांचा. याच देशात सर्वात असुरक्षित आहेत त्या आमच्या भगिनी. कुठे नेऊन ठेवलाय रे देश माझा, असेही ते म्हणाले.