Sun, Feb 17, 2019 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘...आणि लावलेले पोस्टर ‘रडूबाई’ शिवसेनेने फाडून टाकले’

‘...आणि लावलेले पोस्टर ‘रडूबाई’ शिवसेनेने फाडून टाकले’

Published On: Apr 26 2018 1:54PM | Last Updated: Apr 26 2018 1:54PMठाणे : पुढारी ऑनलार्इन

शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केली आहे. आम्ही लावलेले पोस्टर ‘रडूबाई’ शिवसेनेने फाडले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यानी केला आहे. शिवसेना खोटारडी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. या संदर्भातील फोटो आणि संदेश आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. 

दरम्यान, ‘ शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक. ठाणे महापालिकेत गेल्या ३ वर्षात मालमत्ता करामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सांगितलं होतं, कर कमी करणार आणि केली करवाढ’ असे पोस्टर डॉ.जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यात लावले होते. या पोस्टरखाली ‘तुम्हाला आकारण्यात येणारी टॅक्स पावती नक्की तपासा’ अशी तळटीपही देण्यात आली होती. 

राष्ट्रवादीने लावलेले हे पोस्टर ‘रडूबाई’ शिवसेनेने फाडले असल्याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेना #खोटिरडीसेना हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. या ट्विटसह पोस्टरचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. 

Image may contain: text