Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिला फोन शरद पवारांनीच केला; सेना पाठिशी राहिली: भुजबळ 

पहिला फोन शरद पवारांनीच केला; सेना पाठिशी राहिली: भुजबळ 

Published On: May 10 2018 1:33PM | Last Updated: May 10 2018 1:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

जामीन मिळाल्यावर मला शरद पवारांनी पहिला फोन केला होता. पंकज आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट होती, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पंकज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधान आले होते. याच चर्चांना फुलस्टॉप देत, शिवसेनेने पडत्या काळात माझ्याबद्दल दोन चांगले शब्द बोलले म्हणून आभार माणन्यासाठी पंकज मातोश्रीवर गेल्याचे छगन भुजबळ म्हणाले. 

जामीन मंजूर झाल्यानंतर अडीच वर्षानंतर छगन भुजबळ घरी परतले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या सभेला मी १०० टक्के हजेरी लावणार आहे. राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात. सत्य सर्वांच्या समोर येईल. खरे तर तुम्हीच सत्य शोधायला हवे होते, वेळ आल्यावर सर्व सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

जास्त बोलू नका. जास्त बाईट देऊ नका असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. नाहीतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल. पुन्हा तपासण्या कराव्या लागतील, असेही भुजबळांनी सांगितले. डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवरूनच डिस्चार्ज दिला असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत. 

‘महाराष्ट्र सदन सुंदर बनानेवाला अंदर’

‘महाराष्ट्र सदन सुंदर बनानेवाला अंदर’ या भाजप खासदारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हमाले, त्यांचे म्हणणे खरेच होते, ‘मै अंदर था’. पण, सदन तर सुंदर झाले. देशभरातील लोक त्याला भेट देत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सामन्य लोक तेथे जात आहेत.  महाराष्ट्र सदन उभे राहिल्याचा आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

माझे आणि त्यांचे २५ वर्षांचे ऋणानुबंध आहेत. आत असताना त्यांनी माझ्याबद्दल वर्तमानपत्रातून, फोन करून चांगले शब्द काढले. माझ्या पाठिशी राहीले. यामुळेच पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले,असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.