Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घटना नको म्हणणार्‍यांना उद्ध्वस्त करू : शरद पवार

घटना नको म्हणणार्‍यांना उद्ध्वस्त करू : शरद पवार

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर मागील चार वर्षांपासून गरीब, दलित, आदिवासी व मुस्लिम जनतेवर अन्याय सुरू आहे. हातात मांस घेऊन जाणार्‍यांच्या हत्या होत असताना सरकार निश्‍चिंत आहे. संविधान नको म्हणणारे लोक घटनात्मक अधिकारांवरच  गदा आणत असल्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

यशवंतराव चव्हाण केंद्रात बुधवारी आयोजित केेलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, ही लढाई सोपी नाही; पण ती आपल्याला लढायची आहे. भारतीय संविधान हे या देशातील नागरिकांचा आधार आहे; पण काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. आपल्या बाजूच्या पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका या देशात अनेकदा संविधान बदलण्याचा प्रयत्न होतो. आपल्या देशात तसा प्रयत्न झाला, तर तळातील गरीब माणूस पेटून उठतो.

ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिला, घटनेबद्दल आजच्या राज्यकर्त्यांना आदर राहिलेला नाही, असा आरोपही पवार यांनी केला. भाजपची मूळ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेबद्दल असुया आहे. घटनेवर प्रेम असल्याचे वक्‍तव्य ते करतात; पण ती धादांत खोटी आहेत. नव्या पिढीसमोर घटनेबद्दल आशंका निर्माण करण्याचे काम ही संघटना करत असल्याचे पवार म्हणाले.