Mon, Mar 25, 2019 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांनी ब्रेकिंग न्यूज होणार नाही याची काळजी घेतली!

पवारांनी 'ब्रेकिंग' होणार नाही याची काळजी घेतली!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मोखाडा : हनिफ शेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी एकाच दिवसात उद्योजक, शेतकरी, मच्छीमार तसेच स्थानिकांशी चर्चा करून जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा घेतला. या दौर्‍यात त्यांनी एका पार्कचे उद्घाटन केले. ते जिल्हा दौर्‍यावर येण्याअगोदर डहाणू आणि पालघर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते. यानुसार पवार येथील उद्योग, राजकारण, येऊ घातलेले प्रकल्प या नाजुक विषयांवर काही भूमिका स्पष्ट करतील आणि कसेतरी गोत्यात येतील असे विरोधीपक्षांना वाटत होते.

स्वकीयांनी पक्षा पेक्षा स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी डहाणू ग्रीन झोनबाबत साहेबांनी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी फिल्डींगच एकप्रकारे लावली होती. मात्र, पवारांना तेल लावलेला पैलवान का म्हणतात, याची प्रचिती पालघर जिल्हावासीयांना आली. आणि पवार साहेबांनी बॅटींग न करता गुगली टाकून त्यात बॅट्समन आणि फिल्डरांना आऊट केले, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डहाणु 91 नोटिफिकेशेन नुसार ग्रीन झोन असल्याने येथे घर बांधकामांपासून उद्योग धंद्यापर्यंत सगळ्यांनाच आठकाठी येते. त्यामुळे ग्रीन झोन हटवावा किंवा अनेक जाचक अटी रद्द कराव्या अशी मागणी डहाणूतील काही उद्योजक, राजकारणी अगदी पुर्वीपासून करत होते. यामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी अन आता भाजपवासीय झालेले काही नेतेही आहेत. अशा परिस्थितीत पालघर शहरातील एका नगरसेवकाने स्वखर्चाने बांधलेल्या पार्कच्या उद्घाटनाचे आमंत्रण पवारांना दिल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील हे सर्वच कार्यक्रम पार पाडण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार दिवसभर कार्यक्रम झाले. यात पहिला कार्यक्रम होता डहाणू येथील वाढवण बंदर, बुलेट ट्रेन असे विविध प्रकल्प येथून जाणार याबाबत स्थानिक नागरीक मच्छीमार संघटना याभागातील उद्योजक यांच्य भावना समजून घेणे. हा आणि याही पेक्षा तेथील सर्वांचे लक्ष होते ते डहाणू ग्रीन झोनबाबत पवार साहेब काय भूमिका घेतात त्याची. या दौर्‍याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर ग्रीन झोन हटवण्याची भूमिका घेतली जाणार आहे काय ? त्यासाठी ही बैठक आहे काय ? या आशयाचे मेसेज फिरत होते. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, ग्रीन झोनला समर्थन करणार्‍या संघटना आणि पर्यावरणवादी नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र पवारांनी यावेळी विकासाला विरोध नाही, असे सांगत, तो विकास नागरिकांच्या विरोधातला नसावा अशी स्पष्ट भूमिका घेतली. बुलेट ट्रेनला तुमचा विरोध असेल तर, ही भूमिका संसदेत मांडेल असे त्यांनी कबूल केले. मात्र, या बैठकीत मुख्य ग्रीन झोनबाबत हटवावे की ठेवावे याबाबत काहीच भाष्य न केल्याने उद्योजक आणि राजकारणांची घोर निराशा झाली. पवारांच्या भूमिकेवर राजकरण करायाला टपून बसलेल्या विरोधकांनाही कोणतिही संधी दिली नाही. त्यांनी हे करताना पर्यावरणवादी आणि भूमिपुत्रांच्याही भावनांचा आदर ठेवला हे विशेष. 

यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सर्व राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी पालघर विधानसभा आणि लोकसभा राष्ट्रवादीकडे घ्या, आपण ती ताकदीने लढवू असा सूर लावाला. यावरही भाष्य करताना शरद पवारांनी कोणतिही ब्रेकिंग न्यूज होणार नाही याची काळजी घेतली.

शरद पवारांनी स्वकीय नगरसेवकाच्या पार्क उद्घाटनानंतर जनतेशी परिसंवाद करताना गोंदीया काँग्रेसला देऊन ही जागा राष्ट्रवादीकडे घेणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला अजून कोणताही निर्णय न झाल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला काँग्रेसने पंतप्रधानपदाची ऑफर दिली का? या प्रश्‍नाला उत्तर देताना ती टेबल न्यूज होती. ती कोणी व का सोडली हे कळायला मार्ग नाही असे उत्तर दिले. 

Tags : NCP, Sharad Pawar, Palghar


  •