Thu, Feb 21, 2019 09:02



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या मारहाणीने माझी बदनामी

मनसेच्या मारहाणीने माझी बदनामी

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:02AM



ठाणे : वार्ताहर

माजीवडा पुलाखाली तृतीयपंथी वेश्याव्यवसाय करीत असल्याने सर्वसामान्यांना होणार्‍या त्रासामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत वेश्याव्यवसाय करणार्‍या तृतीयपंथीयाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीमुळे आपली बदनामी झाली आहे. यामुळे मी आत्महत्या करणार आहे. मला मारहाण करणार्‍या मनसैनिकांसह महिला व जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा व्हीडीयो व्हायरल झाला आहे. यामुळे मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली आहे. याप्रकरणी सर्वच मारहाण झालेल्या तृतीयपंथीचा पोलीस शोध घेत आहेत. 

दरम्यान जाधव यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून माजीवडा पुलाखाली उद्यान बनविण्याचा निर्णय घेतला. उद्यानाच्या निर्मितीने लोकांचा वावर वाढेल आणि तृतीयपंथीचा वेश्याव्यवसाय बंद पडेल आणि नागरिकांना त्रास होणार नाही. या चर्चेत पालिका आयुक्तांनी उद्यान बनविण्याचे आश्‍वासन दिले. तृतीयपंथी आत्महत्येबाबत जाधव यांनी लोकांच्या त्रासाची दखल घेऊन मनसेने आंदोलन केले. कार्यकर्ते जामिनावर सुटले आहेत. लोकांसाठी पुन्हा जेलमध्ये जाण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले.