Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुस्लीम समाजही  आरक्षणासाठी आक्रमक

मुस्लीम समाजही  आरक्षणासाठी आक्रमक

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा व धनगर समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक व्हायचे ठरविले आहे.  या समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.  आरक्षणासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्णयही  घेण्यात आला. 

अंजुमन इस्लाम हायस्कुल येथे मुस्लीम  समाजाच्या  आरक्षणाबाबत भूमिका  व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीची बैठक  बोलविण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ पी. ए. इनामदार होते. मुस्लीम समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्यात आले होते. हा समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे विविध अहवालातुन स्पष्ट झाले आहे. या समाजाला जे आरक्षण देण्यात आले होते ते घटनात्मक आहे. या समाजाच्या विकासासाठी हे आरक्षण गरजेचे असुन मिळालेले आरक्षण ठेवण्यासाठी आता लढा  उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

मुस्लीमानी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरावी, शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे, आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणे, यावर प्राधान्याने चर्चा झाली या प्रकारच्या लढ्यास आपण तयार असल्याचे इनामदार यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

बैठकीला खासदार हुसेन दलवाई, मौलाना मुस्तकीम, अब्दुल करीम सालार, इकबाल अन्सारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार युसुफ अब्राहनी, इम्तीयाज शेख, अ‍ॅड. शकील काझी, सादिक खान, युसुफ अन्सारी, हसीब नदाफ, सलीम अल्वारे, खुर्शिद सिद्दीकी, रशिद अजीम, हाजी मुशीर अन्सारी, आदी यावेळी उपस्थीत होते.