Mon, Nov 19, 2018 09:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मरेची पाच स्थानके होणार कॅशलेस!

मरेची पाच स्थानके होणार कॅशलेस!

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी
आधी मुंबई रेल्वेची तीन स्थानके कॅशलेस केल्यानंतर आता आणखी पाच स्थानकावर कॅशलेस सुविधा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला असून, प्रवाशांची त्यामुळे मोठी सोय होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या तीन स्थानकांनंतर आता आणखी पाच स्थानकांत कॅशलेस सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये भायखळा, दादर, माटुंगा स्थानकांबरोबरच कल्याण आणि अंबरनाथ या स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. या पाच स्थानकांमध्ये सहा महिन्यांत कॅशलेश सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.  

Tags : Mumbai, Mumbai news, Murray, cashless, five station,