Sun, Jul 21, 2019 02:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पित्याकडून मुलीच्या प्रियकराची हत्या

पित्याकडून मुलीच्या प्रियकराची हत्या

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:34AMठाणे : प्रतिनिधी

मुलुंड तेथील रहिवाशी आणि दुबईत इंजिनियर असलेल्या 47 वर्षीय उच्चशिक्षित बापाने इतर दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या मुलीच्या प्रियकराला धावत्या रेल्वेतून फेकून देत हत्या केल्याच्या प्रकरणाचा उलगडा ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केला आहे. ही हत्या केल्यानंतर तो दुबईत पळून गेला होता. दरम्यान, दुबईतून परतल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास मुंबई विमानतळावरून अटक केली. राजेंद्र तिवारी (47) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

दिवा येथे राहणारा सुरेंद्र मिश्रा (26) याचे राजेंद्र तिवारीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. आपल्या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडावे म्हणून तिवारीने मृत सुरेंद्र यास वारंवार समजावले होते. मात्र तरी देखील सुरेंद्र याने आपले प्रेमसंबंध संपुष्टात आणले नाहीत. याच गोष्टीचा राग मनात धरून राजेंद्र तिवारी याने त्याचे साथीदार भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्या सहाय्याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. दरम्यान, 14 जुलै रोजी तिघांनी सुरेंद्रचे कोपरीतून अपहरण केले आणि त्यास रात्रभर मारहाण केली. त्यानंतर त्यास 15 जुलै रोजी रेल्वेत बसवुन खडवली येथे नेले व निर्जनस्थळी धावत्या लोकलमधून ढकलून दिले. त्यात सुरेंद्र याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी राजेंद्र तिवारी दुबईत पळून गेला. तर दोघे आरोपी भूमिगत झाले. 

दरम्यान, रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या सुरेंद्र याची ओळख न पटल्याने शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सुरेंद्र घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.