Tue, Apr 23, 2019 01:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेच्या रुग्णालयांत रोबोटिक शस्रक्रिया!

पालिकेच्या रुग्णालयांत रोबोटिक शस्रक्रिया!

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 12:58AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

खासगी रुग्णालयात उपलब्ध असणारी रोबोटिक शस्रक्रिया आता मुंबई महापालिकेच्याही रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रोबोटिक शस्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात नगरसेविका सईदा खान यांनी स्थायी समितीत प्रस्ताव मांडला होता. यासाठी पालिका प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू झाले आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे अत्याधुनिक उपचारांबरोबच अचूकताही वाढणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेणार्‍या गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

रोबोटिक शस्रक्रियेचा कॅन्सर, लिव्हर सर्जरी अशा मोठ्या व अवघड शस्रक्रियेसाठी उपयोग होत असतो. अनेक वेळा डॉक्टर रोबोटिक शस्रक्रियेचा रुग्णांना सल्ला देतात, मात्र पालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या सर्वसामान्यांना महागड्या शस्त्रक्रिया आवाक्याच्या ठरतात. सरकारी रुग्णालयांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोट आणण्याचा विचार सुरू आहे. यामुळे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रोबोट वेगाने करू शकणार आहे.