Wed, Feb 20, 2019 22:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनपा कर्मचार्‍यांचा मुंबई महापालिकेवर उद्या मोर्चा

मनपा कर्मचार्‍यांचा मुंबई महापालिकेवर उद्या मोर्चा

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवण्याची पध्दत बंद करून त्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी, वैद्यकीय गट विमा योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू व्हावी, वेतन करारातील त्रुटी दूर करून नवीन वेतन कराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात या प्रमुख मागण्यांसहित इतर मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे सोमवारी 26 मार्च रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

यांत्रिक झाडू व एरिआ बेस च्या नावावर सुरु असलेले खासगीकरण थांबवावे, विविध खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, महापालिकेची रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत, कामगारांना मालकी हक्काने घरे द्यावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पत्रकार परिषदेला अ‍ॅड सुखदेव काशीद, सुभाष पवार, बाबा कदम, सत्यवान जावकर, अ‍ॅड महाबळ शेट्टी, अ‍ॅड प्रकाश देवदास, दिवाकर दळवी व इतर नेते उपस्थित होते. 

Tags : Municipal employees, tomorrow, march, Mumbai Municipal Corporation, mumbai