Tue, Apr 23, 2019 21:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २४ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद

२४ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दोन महिने बंद

Published On: Apr 20 2018 1:25AM | Last Updated: Apr 20 2018 1:21AMठाणे : प्रतिनिधी 

16 एप्रिलला सुरू होणारे  मुंब्रा बायपासच्या  दुरुस्तीचे काम अखेर 24 एप्रिलपासून सुरू होणार असून यासाठी ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक शाखेने पूर्ण तयारी केली आहे. या कामामुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने जेएनपीटीकडून येणारी 80 टक्के वाहतूक ही त्याच ठिकाणी थांबवली जाणार असून केवळ 20 टक्के वाहतूक सोडली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे. दुरुस्तीच्या वेळी वाहतूक मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये यासाठी जेएनपीटीकडून वाहनचालकांना टोकन देण्यात येणार असून यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतूक करण्याची वेळ आणि माहितीपत्रक देण्यात येणार आहे.  देण्यात आलेल्या टोकननुसार वाहतूक न केल्यास मोटार व्हेईकल कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे . शहरात वाहतूक होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंब्रा बायपासच्या काळात शहरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी या दुरुस्तीच्या कामाला वाहतूक शाखेकडून परवानगी देण्यात येत नव्हती.  मात्र आता वाहतूक शाखेच्या वतीने सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला गेला असून आता येत्या 24 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 2 महिने हे काम सुरू राहणार असून त्यासाठी पूर्णतः वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणे आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. हा रास्ता मुख्यतः जेएनपीटीकडून येणार्‍या आणि जाणार्‍या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. 

सोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठीदेखील चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक याचा वापर करतात. या सर्वांना 2 महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. जंक्शन ते रेतीबंदर असे हे काम करण्यात येणार आहे. 

केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडले जाणार आहे . या गाड्यांना विशेष मार्किंग केले जाणार आहे, याशिवाय जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणार्‍या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे. ठाणे आणि नवीन मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

1.जेएनपीटी- नवी मंबई- दक्षिण भारतात पुणेमार्गे-कळंबोली सर्कल- नवी मुंबई - तळोजामार्गे येथून नाशिक, गुजरात भिवंडी येथून उत्तर भारतात जाणार्‍या अवजड वाहनांना कल्याण फाटा आणि शिळफाटामार्गे मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

पर्यायी मार्ग

जेएनपीटीकडून - नवी मुंबईकडून नाशिक दिशेने जाणारी जड आणि अवजड वाहने जेएनपीटी पॉईंट, पळसपाडा, डावीकडे वळण घेऊन जुन्या मुंबई रोडने चौकगांव, चौकफाटा, त्यानंतर डावीकडे वळण घेऊन कर्जत मुरबाड, डावीकडे वळण घेऊन सरळगाव, डावीकडे वळण घेऊन किन्हवलीमार्गे शहापूरवरून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून नाशिक किंवा नाशिकच्या दिशेने इच्छित मार्गे जाऊ शकतात, ही वाहतूक 24 तासांसाठी खुली राहणार आहे. 

जेएनपीटी - नवी मुंबई येथून भिवंडीकडे जाणारी अवजड वाहने रात्री 11 ते 5 या कालावधीत जेएनपीटी, कळंबोली सर्कल, तळोजा, कल्याण फाटा, या ठिकाणी उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडने कटाई, पत्रीपूल, कल्याण दुर्गाडी सर्कल पूल, कोणगाव, रांजणोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून भिवंडीकडे जातील.

2.नवी मुंबईकडून उरण फाटामार्गे महापे  सर्कलकडून शिळफाटामार्गे गुजरातकडे जाणार्‍या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन शिळफाट्याकडे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.   

पर्यायी मार्ग  

रात्री 11 ते पहाटे  5 या वेळेत महापे सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन हॉटेल्स पोर्टिका सरोवर समोरून उजवे वळण घेऊन रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळे नाका, ऐरोली पटनी सर्कल, डावीकडे वळून ऐरोली सर्कल, उजवीकडे वळण घेऊन मुलुंड ऐरोली पुलावरून ऐरोली टोल नाकामार्गे उजवीकडे वळण घेऊन पूर्व द्रुतगती मार्ग  मुलुंड आनंदनगर टोल नाक्यावरून घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने जातील. 

3.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8- अहमदबाद गुजरातकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे व पुणे मार्गे दक्षिण भारतात जाणारी अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास वापरणे 24 तास बंद करण्यात येणार आहे.  

पर्यायी मार्ग

टेंननाका वसईमार्गे वाकोडा टोल प्लाझा, वाडा गाव या ठिकाणी उजवीकडे वळण घेऊन, कवाड टोल नाका- नदी नाका पुलावावरून डावीकडे वळण घेऊन चवींद्रा, वडापा, मुंबई नाशिक हायवेवरून उजवीकडे वळण घेऊन पुढे येवाई नाका या ठिकाणी डावीकडे वळण घेऊन- पाईप लाईनमार्गे, सावध चौक - उजवीकडे वळण घेऊन गांधारी पुलावरून - आधारवाडी सर्कल-उजवीकडे वळण घेऊन दुर्गाडी पत्रीपूलमार्गे टाटा हाऊस - बदलापूर चौक येथून डावीकडे वळण घेऊन खोली सर्कलमार्गे उजवीकडे वळण घेऊन तळोजामार्गे एमआयडीसी नावडा फाटाकडून डावीकडे वळण घेऊन कळंबोली सर्कलवरून  रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत इच्छास्थळी पोहोचतील. 

चिंचोटी येथून जेएनपीटी येथे भिवंडी नारपोलीमार्गे जाणार्‍या वाहनांना पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंद करण्यात आला आहे. परंतु चिंचोटीवरून नारपोली भिवंडी परिसरात येणा़र्‍या अवजड वाहनांना मालोडी टोलनाकामार्गे पूर्णवेळ अंजूरफाटा येथे प्रवेश देण्यात येत आहे. 

वर्सोव्याकडून जेएनपीटी नवी मुंबई व दक्षिण भारतात जाणार्‍या अवजड वाहनांना रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत प्रवेश देण्यात येत असून ती वाघोड बंदर रोडने कापूरबावडी-कोपरी पूल - मुलुंड चेकनाका- ऐरोली टोलनाकामार्गे-ऐरोली टोल नाकामार्गे ऐरोली सर्कल-डावीकडे वळण घेऊन पटनी जंक्शन- उजवीकडे वळण घेऊन रबाळे नाका, महापे सर्कल- उरण फाटा येथून इच्छित स्थळी जातील. 

घोडबंदर रोडने गुजरातकडून नवीन मुंबई जेएनपीटीकडे येणारी व नवीन मुंबई जेएनपी टी घोडबंदर रोड मुरबाडकडे जाणारी अवजड वाहने दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत आनंदनगर चेक नाकामार्गे जेएनपीटी गुजरातकडे ये-जा करतील. 

4. भिवंडीकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे जाणार्‍या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 

पर्यायी मार्ग

भिवंडीकडून जेएनपीटी किंवा पुणेमार्गे जाणार्‍या जड अवजड वाहनांना माणकोली जंक्शन - नाशिक मुंबई हायवे-रांजणोली नाका, किन्हवली, सरळगाव वरून उजवीकडे 

रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत भिवंडीवरून माणकोली नाका, डावीकडे वळून मुंबई नाशिक हायवे- रांजणोली नाका- येवाई नाका उजवीकडे वळून - सावध चौक - गांधारी पूल - आधारवाडी- दुर्गाडी सर्कल- पत्री पूल- बदलापूर चौक- कटाई चौक- उजवीकडे वळून कळंबोली सर्कल मार्गे.