Tue, Jul 16, 2019 22:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची राणीच म्हणते, मुंबई गेली खड्ड्यात !

मुंबईची राणीच म्हणते, मुंबई गेली खड्ड्यात !

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

एफएमवर मुंबईच्या खड्ड्यांचा विषय दरवर्षी नेटाने लावून धरणारी मुंबईची राणी आर. जे. मलिष्काने आता ‘मुंबई गेली खड्ड्यात’ असे नवे गाणे वाजवायला सुरुवात केली आहे. सुपर हिट सैराटच्या झिंगाट गाण्याची चाल घेत मलिष्काने इन्स्टाग्रामवर हे नवे गाणे लाईव्ह टाकत मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न मांडला आहे. बारीश आली, अख्खी मुंबई पाण्याखाली गेली, रस्त्यांची लागली वाट, गेली गेली मुंबई खड्ड्यात गेली गेली मुंबई खड्ड्यात...असे या नवीन गाण्याचे बोल आहेत.

गेल्यावर्षी सोनू तुला म्हायावर भरवसा नाय काय या गाण्यावर होती तशीच तीव्र प्रतिक्रिया यावेळेसही  शिवसेनेने दिली. मलिष्का म्हणजे पावसातील बेडूक आहे. पाऊस आला की बेडुक डराव डराव करतो तसे खड्डे दिसले की मलिष्का झिंगाट होते. अनेक राज्यात खड्डे आहेत. मात्र शिवसेनाद्वेषाची कावीळ झालेल्या मलिष्काला मुंबईतले खड्डे बरोबर दिसतात. थोडक्यात काय झिंग झिंग झिंगाट... मलिष्का भिंग भिंग भिंगरी भिंगाट... अशीच तिची अवस्था आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.