Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या डॉक्टरची मार्क झुकरबर्गला २ कोटींची नोटीस

मुंबईच्या डॉक्टरची मार्क झुकरबर्गला २ कोटींची नोटीस

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी

डॉ. देबराज शोम या मुंबईतील एका प्लास्टिक सर्जनने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट अचानकपणे बंद केल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला दोन कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. 3 मार्च रोजी शोम यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जेट एअरवेजवर टीका केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे इंस्टाग्रामचे अकाऊंट बंद करण्यात आले.

डॉ. देबराज यांना इंस्टाग्रामवर तब्बल 25 हजार युजर्स फॉलो करत होते. 3 मार्च रोजी देबराज हे हैदराबादवरून मुंबईला जेट एअरवेजने परतत होते. त्यावेळी बोर्डिंगच्या ठिकाणी त्यांच्याकडील सामानाचे वजन ठरवून दिलेल्या वजनापेक्षा जास्त असल्याचे सांगत त्यांना त्यासाठी अतिरिक्त पैसे भरण्यास सांगितले. देबराज यांनी पैसे भरण्यासाठी त्यांचे कार्ड दिले, मात्र त्या काऊंटरवरची स्वाईप मशीन बंद असल्याने त्यांना दुसर्‍या काऊंटरवर जिथे रोख पैसे घेण्याची सोय होती त्या रांगेत थांबण्यास सांगितले. मुंबईला परतल्यावर देबराज यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा अनुभव शेअर केला. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले.

देबराज यांनी इंस्टाग्रामला ई-मेल पाठवून विचारणा केली. मात्र उत्तर न आल्याने त्यांनी फेसबुकला व मार्क झुकरबर्गला नोटीस बजावून त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी दोन कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. 

Tags : Mumbais doctor, notice, Mark Zuckerberg,