Thu, Jun 27, 2019 17:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मल्टिस्टेट दुधावर भागली मुंबईकरांची तहान

मल्टिस्टेट दुधावर भागली मुंबईकरांची तहान

Published On: Jul 20 2018 12:37AM | Last Updated: Jul 20 2018 12:30AMमुंबई : विशेष प्रतिनिधी                                  

राज्यातील दूध बंद आंदोलनाची थोडीशी झळ गुरुवारी मुंबईकराना वेगळ्यारीतीने  पोहचली . राज्यातील दूध संघाकडून नियमित मिळणार्‍या ब्रँडचे दूध मुंबईतील काही भागात जेथे उपलब्ध झाले नाही . तेथे मल्टिस्टेट कंपनीच्या दुधाने गरज मागविण्यात आल्याने  मुंबईकरांना  दिलासा मिळाला असून त्याना  दूध टंचाईची झळ लागली नाही .                                           

दूध बंद आंदोलनाचा  किंचितचा परिणाम  तीन दिवसानंतर मुंबईत घरोघरी सकाळी घरी दुधाच्या ब्रँडमध्ये बदल झाल्याने काहींना  जाणवला पश्चिम महाराष्ट्रातुन नियमित येणार्‍या गोकुळ, वारणा, गोविंद, प्रभात,कृष्णा , शिवनेरी सह दूध सहकारी  संघाच्या दुधसाठा थोडा कमी प्रमाणात मुंबईत आला मात्र मुंबईत साडेसात लाख  लिटरचा  नियमित दुधाचा पुरवठा करणार्‍या गोकुलचा 50 टक्के दूधसाठा न आल्याने दूध विक्रेत्यांनी दूध ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मल्टिस्टेट कंपन्यांचे दुध  ग्राहकापर्यंत पोहचविल्याचे मुंबईच्या अनेक भागात दिसून  आले.                         

राज्याच्या काही जिल्ह्यात विशेषतः पश्विम महाराष्ट्रात आंदोलनामुळे दूध उत्पादक  संघाकडे येणारे दूध संकलन कमी झाले त्यामुळे मुंबईकडे पाठवण्यात येणार्‍या दुधाच्या साठ्यात कमतरता दिसली मुंबईत दुसर्‍या क्रमांकाचा दूध पुरवठा करणार्‍या गोकुळचे दूध हे मुंबईत 50 टक्क्यांनी कमी आल्याने , किरकोळ विक्रेत्यांनी गोकुळ ऐवजी अमूल, मदर डेअरी आणि नंदिनी या मल्टिस्टेटचे दुध देऊन मुंबईकरांची गरज भागवली .           

50 ते 60 लाख लिटर दुधाची गरज असलेल्या मुंबई शहरात गुजरातच्या अमूल ब्रँडने आधीच जम बसविला आहे विरार येथे 20 लाख लिटर दुधसाठा राहील एवढे प्रक्रिया केंद्र असून शहापूर आणि बोईसर याठिकाणी ही केंद्रे आहेत त्यामुळे दररोज 15 ते 18 लाख लिटर पेक्षा अधिक दूध पुरवठा केला जाईल अशी व्यवस्था अमूल ने केली असल्याचे समजते त्याचप्रमाणे उत्तर भारतात जाळे असलेल्या मदर डेअरीचा मुंबईत रोजचा  2 लाख लिटर खप आहे अमूल आणि मदर डेअरीने नाशिक मार्गे तसेच मुंबई अहमदाबाद मार्गे दूध मुंबईत उतरविण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते तसेच कर्नाटकच्या नंदिनीने दुधाचे टँकर हे मुंबई पुणे महामार्गावरून न आणता सोलापूर, अहमदनगर मार्गे मुंबईत आणले असल्याचे समजते त्यामुळे अन्य राज्यातून मुंबईत आलेला दूध साठा हा 10 ते 15 टक्के अधिक आल्याने मुंबईकराना दुधाची टंचाई जाणवली नाही मात्र , घरी येणार्‍या नियमित ब्रँडच्या दुधा ऐवजी मल्टिस्टेटच्या दुधावर आजतरी मुंबईकराना समाधान मानावे लागले.