Tue, Feb 19, 2019 01:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांचा ‘वीकेण्ड’ पाण्यात 

मुंबईकरांचा ‘वीकेण्ड’ पाण्यात 

Published On: Jun 08 2018 11:16AM | Last Updated: Jun 08 2018 11:00AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून वेळेवर डेरेदाखल झाला आहे. मान्सूनने मुंबईत एन्ट्री घेताच झोडपून काढले. हवामान खात्याने येत्या ८ ते ९ जून पासून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

मुंबईची पहिल्याच पावसात दैना उडाली. बऱ्याच भागात पाणी साठले तर लोकल धिम्या झाल्या. आता हवामनाखात्याने येत्या ८ आणि ९ जूनला पावसाची तीव्रता वाढणार असल्याचे संकेत दिली ओहत. तसेच मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तर नागरिकांना या दिवशी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे सांगितले आहे. त्यामुळे या वीकेण्डला पहिल्या पावसाचा आस्वाद घेण्याच्या मुंबईकरांच्या मनसुब्यांवर ‘अतीवृष्टीचे पाणी’ फिरणार आहे. 

हावामनाखात्याच्या इशाऱ्यानंतर महानगरपालिकेने खबादारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने सर्व नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे तर सर्व शांळांना पावसात अडकलेल्याना आसरा देण्याचे आव्हान केले आहे. 
 

Tags : Mumbai, Mumbai news, heavy rain, weekend, warning from the meteorological department