Wed, Feb 20, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे केंद्र होणार मुंबईत : मुख्यमंत्री

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे केंद्र होणार मुंबईत : मुख्यमंत्री

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौर्‍यात घेण्यात आला. मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने दावोसच्या दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी फोरमचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकर्‍यांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. दरम्यान, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली.