Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मच्छीमार सुरक्षेसाठी मुंबई ते गोवा मोटारसायकल रॅली 

मच्छीमार सुरक्षेसाठी मुंबई ते गोवा मोटारसायकल रॅली 

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

मच्छीमारांनी समुद्रात घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी तटरक्षक दलाने मुंबई ते गोवा मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. 2 ते 10 जून  या कालावधीत रॅलीचे आयोजन केल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिली.

मच्छीमार सुरक्षा संदेश रॅलीमध्ये कोस्टगार्ड, ओएनजीसी, सीमाशुल्क विभाग, पोलीस, नौदल, हवाई दल, तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचा समावेश असणार आहे. 2 जून रोजी सकाळी 11 वा. वरळी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाकडून रॅलीची सुरुवात होऊन गोव्यापर्यंत जाऊन पुन्हा किनारपट्टीच्या भागातून प्रवास करत मुंबई येथे 10 जूनला ही रॅली समाप्त होईल.

प्रवासादरम्यान रॅलीच्या थांब्याच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. 2 जून रोजी रॅलीचा मुंबईहून शुभारंभ होणार असून सायंकाळी मुरूड येथे पोहचणार आहे. 3 जून श्रीवर्धन, दापोली, 4 जून दाभोळ, जयगड,  मिरकरवाडा, 5 जून देवगड, मालवण, 6 जून वेंगुर्ला येथे रॅली पोहचेल.