Sun, Nov 18, 2018 11:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारला झुकवा, सरकारसमोर झुकू नका : न्या. कोळसे-पाटील

सरकारला झुकवा, सरकारसमोर झुकू नका : न्या. कोळसे-पाटील

Published On: Jan 13 2018 7:39AM | Last Updated: Jan 13 2018 1:19AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

न्यायमुर्तींच पद हे देवाखालोखाल आहे. त्यामुळे त्यांनी कोणासमोर झुकण्याची गरज नाही. वेळ पडल्यास न्यायपालिका सरकारलाही झुकवु शकते एवढी मोठी  ताकद न्यायपालिकांची आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी न्यायमुर्तीनी केलेल्या आरोपांची दखल घेतली आहे.  यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना न्या. कोळसे- पाटील म्हणाले की, देशातील प्रत्येक संस्था उध्वस्त करण्याच काम सरकारकडून सुरू आहे. या सगळ्यापासुन न्यायालयच देशाच रक्षण करू शकते. सर्वोच्च न्यायालयात जो कारभार सध्या सुरू आहे तो जनतेसमोर येणे महत्वाचे आहे.

न्यायपमुर्तीनी काही प्रमाणात ते काम केले आहे. महत्वाच्या वेळेस आपल्याकडून केसीस काढुन घेतल्या जात असल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला आहे. सरकारलाही वाकविण्याची ताकद न्यायमूर्तींमध्ये असताना त्यांनी सरकारसमोर झुकण्याची काहीच गरज नाही.  स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी परिस्थीती जनतेसमोर आली असुन यामध्ये काहीतरी गोलमाल असल्याचेही ते म्हणाले. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो त्यामुळे यापुढे न्यायपालिकांना एकत्र येऊन काम केले पाहीजे.तेच देशहिताच असल्याचेही न्या. कोळसे पाटील म्हणाले.