Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत सायकल ट्रॅक सुरू; ११.५ किमीची मार्गिका

मुंबईत सायकल ट्रॅक सुरू; ११.५ किमीची मार्गिका

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:43AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईकर नागरिकांसाठी पालिकेने सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू केली. या उपक्रमाचा रविवारी  महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही 11. 5 किेलोमीटरची स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात  आली आहे. निमंत्रितासाठी  प्रथम टप्प्यामध्ये एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह ) ते गिरगाव चौपाटी या पाच कि.मी. रस्त्यावर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा शुभारंभ  झाला. यावेळी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख,  महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलीस आयुक्त  दत्तात्रय पडसलगीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ए.एल. जर्‍हाड, उप आयुक्त  रमेश पवार, सहाय्यक आयुक्त  किरण दिघावकर आदी उपस्थित होते. उपनगरांमध्येदेखील अशीच मार्गिका सुरू करण्याचा विचार असल्याचे आयुक्‍त मेहता यांनी सांगितले.

रविवार, दि. 10 डिसेंबरपासून नागरिकांसाठी ही मार्गिका विनाशुल्क खुली होणार असून नागरिक या ठिकाणी स्वतःची सायकल आणून चालवू शकतो, असे पालिकेने जाहीर केले.