Fri, Sep 21, 2018 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ४० मिनिटांत

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ४० मिनिटांत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार व अन्य सरकारी विभागांतर्फे लवकरच विशेष पावले उचलली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या समुद्री भागात सी-प्लेनची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना आखण्यात आली आहे. याची 9 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे चाचणी घेतली जाणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सागरी बोर्डातर्फे दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात जल परिवहनला प्रोत्साहन देण्याबरोबरच जलसफारीत वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरपर्यंत सी-प्लेन राईड सुरु करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय राष्ट्रीय स्तरावर छोटी छोटी समुद्र पर्यटन सेवा सुरु करण्याचेही नियोजन आहे. याअंतर्गत पहिला मार्ग मुंबई -गोवा हा असून या मार्गावर ही सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याचा ठेका सी -ईगल कंपनीला देण्यात आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या कंपनीतर्फे मुंबई-गोवा दरम्यान समुद्र पर्यटन सेवा सुरु केली जाण्याची शक्यता आहे.