Sun, May 26, 2019 13:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३८ दिवसांत मुंबईकरांनी शोधले २६,९३४ खड्डे

३८ दिवसांत मुंबईकरांनी शोधले २६,९३४ खड्डे

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: चाळण झालेली आहे. त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे. मुंबईच्या खड्ड्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत अवघ्या 38 दिवसांमध्ये 26,934 खड्ड्यांचा शोध मुंबईकरांकडून घेण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते नवीन लादे यांनी मुंबईच्या खड्ड्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी मुंबईतील खड्ड्यांची माहिती गोळा करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले होते. खड्डेमुक्त मुंबईच्या या मोहिमेला 17 जुलै रोजी सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 38 दिवसांत सोळा तरुणांनी मुंबईतील एकूण 26,934 खड्ड्यांची नोंद संकेतस्थळावर करत पालिकेच्या दावा फोल ठरवला. यासाठी रायझिंग ग्रुपच्या 17 सदस्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. 90 टक्के खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा यामुळे उघड झाला असल्याचे लादे यांनी सांगितले.

या सर्व खड्ड्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे करण्यात आली असून मिळणारे प्रमाणपत्र  आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे देण्यात यावे, अशी विनंती लादे यांनी केली.