Mon, Sep 24, 2018 13:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लुटारूंची सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला!

लुटारूंची सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला!

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:05AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मायानगरी मुंबईसह महाराष्ट्र लुटारूंच्या सर्वाधिक पसंतीचे असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्यावर्षात लुटारूंनी महाराष्ट्रामध्ये तब्बल 3 हजार 371.3 कोटींची लूट केली असून तीन वर्षांतील लुटीचा हा आकडा 10 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्यांत चोरीचा मुद्देमाल जप्तीचे प्रमाण एकाही वर्षी दहा टक्क्यांच्यावर गेले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 गेल्या वर्षभरामध्ये देशात तब्बल 6 लाख 71 हजार 139 रुपयांच्या ऐवज लुटीची नोंद राष्ट्रीय गुन्हे अहवालामध्ये करण्यात आली आहे. यात गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश वगळता त्यातुलनेत अन्य राज्यांतील लुटीचे प्रमाण फार कमी आहे. गेल्यावर्षी 3 हजार 278.8 कोटींच्या लुटीसह गेल्या तीन वर्षांत