Fri, Feb 22, 2019 03:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता पालिकेत राव समर्थकांची वेगळी चूल!

आता पालिकेत राव समर्थकांची वेगळी चूल!

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:42AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या समर्थकांना म्युनिसिपल मजदूर युनियनमधून खड्यासारखे बाजूला फेकण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या राव समर्थकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी श्रमिक संघाची स्थापना करून, कामगार क्षेत्रात वेगळी चूल मांडली आहे.

म्युनिसिपल मजदूर युनियनमधून रावांचे सुपुत्र शशांक राव व त्यांच्या समर्थकांना बाजूला करण्यात आले. त्यामुळे राव समर्थकांनी स्वतंत्र युनियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला, शुक्रवारी याची अधिकृत घोषणा शशांक राव यांनी केली. या युनियनमध्ये रावांचे विश्‍वासू समजल्या जाणार्‍या रमाकांत बने यांचा समावेश आहे.

पालिकेत सुरुवातीपासून रावांना मानणार्‍या कामगार व कर्मचार्‍यांची संख्या सुमारे 50 हजाराच्या घरात आहे. हे सर्व कामगार श्रमिक संघाचे सदस्य होण्यास उत्सुक आहेत.