Thu, Apr 25, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मस्जिद स्थानकानजीक मोठा अपघात टळला

मस्जिद स्थानकानजीक मोठा अपघात टळला

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:12AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मस्जीद बंदर स्थानकाजवळ सोमवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर तीन लोखंडी रॉड पडलेले मोटरमनने पाहिले व  प्रसंगावधान राखत त्यांनी लोकल वेळीच रोखल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. 

मस्जीद बंदर स्थानकाजवळ ऐन गर्दीच्या वेळी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामावर जाण्यासाठी निघालेले प्रवासी मोठ्या संख्येने लोकलमध्ये होते. मात्र सतर्क असलेल्या मोटरमन अनुराग शुक्ला यांनी त्वरित लोकल थांबवल्याने मोठा अपघात टळला. 

मोटरमनने दिलेल्या सूचनेनंतर रेल्वे रुळावरील रॉड रेल्वे प्रशासनाने त्वरित हटवले. यापूर्वी देखील रेल्वे मार्गात घातपात करण्याचे प्रयत्न समोर आलेले असल्याने संवेदनशील असलेल्या मुंबई लोकलच्या मार्गात हे लोखंडी रॉड नेमके कसे आले याबाबत रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला आहे.