होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात अायएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Published On: Apr 16 2018 4:11PM | Last Updated: Apr 16 2018 4:59PMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेला वाद त्यांना नडल्यामुळे ही बदली झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव हे आता पुणे महापालिकेचे आयुक्त असतील. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. 

राज्य प्रशासनामध्ये फेरबदलाला सुरुवात झाली असून, सोमवारी बदल्यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली. सुधाकर शिंदे यांचा ठाकूर पिता पुत्रांशी वाद निर्माण झाला होता. या वादातून त्यांच्याविरोधात महापालिकेत अविश्‍वास ठरावही आणण्यात आला होता. तो मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे शिंदे पनवेल महापालिकेतच रहातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले राजकीय वजन भारी पडल्याने शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा आहे. 

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेत कचरा प्रकरण राज्यभर गाजले होते. मुळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील असलेले आणि धडाडीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनील चव्हाण यांच्याकडे आता या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची जबाबदारी असेल. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. 

मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांचीही बदली नागपूर  मनपा आयुक्त म्हणून तर त्यांच्या जागी सचिन कुर्वे यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी, रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. 

अन्य बदल्या पुढीलप्रमाणे ....

...........................................................................................................
अधिकारी            सध्याचे ठीकाण        बदलीचे ठीकाण                                                                                 
..............................................................................................................                                
राहुल व्दीवेदी -  जिल्हाधिकारी वाशिम   -     जिल्हाधिकारी अहमदनगर          
आंचल गोयल  -     आयटीडीपी, डहाणू    -    सीईओ रत्नागिरी, जि.प.

डॉ. एस. एल. माळी - आयुक्त, महिला व बालविकास -   आयुक्त, नांदेड म.न.पा. 

माधवी खोडे  -   अति. आयुक्त, आदिवासी विकास -   आयुक्त, महिला व बालविकास      

                         
एस. राममुर्ती    -     सीईओ, अकोला - महाव्यवस्थापक खाण खणीकर्म महामंडळ 

                                    
डॉ. संजय यादव  -     एमएमआरडीए    -    सीईओ अकोला जि.प.  
                

सी. एल. पुलकुंडवार -   जिल्हाधिकारी, बुलढाणा - सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी


निरुपमा डांगे  -   महाव्यवस्थापक खाण खणीकर्म महामंडळ  -      जिल्हाधिकारी, बुलढाणा  


डॉ. बिपिन शर्मा   - शिक्षण आयुक्त, पुणे  -                      एम.डी. मेडा, पुणे


रुचेश जयवंशी    -    उपसचिव, पाणीपुरवठा   -                        आयुक्त, अपंग कल्याण 


एन. के. पाटील    -       आयुक्त, अपंग कल्याण  -                         प्रशिक्षण


डॉ. ए. एम. महाजन  -   जिल्हाधिकारी, अहमदनगर -                    उपसचिव, पाणी पुरवठा 


एस. आर. जोंधळे  -    जिल्हाधिकारी, जालना -                        जिल्हाधिकारी, मुंबई शहर 


संपदा मेहता     -        जिल्हाधिकारी, मुंबई शहर -                    पणन आयुक्त, नवी मुंबई 


एम. जी. आरड     -    सीईओ, औरंगाबाद जि.प. -                  आयुक्त, अहमदनगर म.न.पा. 


जी.एस. मांगले     -     आयुक्त, अहमदनगर म.न.पा.  -           एम. डी. महानंद 


पवनीत कौर    -          आदिवाशी विकास प्रकल्प, जव्हार -       सीईओ, औरंगाबाद जि.प. 


एच मोडक       -      अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर