Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावत’विरोधात सेन्सॉर बोर्डावर धडकला राजपूत समाजाचा मोर्चा

‘पद्मावत’विरोधात सेन्सॉर बोर्डावर धडकला राजपूत समाजाचा मोर्चा

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राणी पद्मावत या  चित्रपटावर बंदी घालण्यात यावी,  अशी मागणी करीत सेन्सॉर बोर्डावर राजपूत समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी  मोर्चात राजपूत समाजाचे नेते अजय सिंह सेंगर, अमिता चौव्हान, राज शेखावत, बाबा ठाकूर, हिम्मतसिंह चुडावत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताडदेव पोलिसांनी ताब्यात घेतले.  सेन्सॉर बोर्डाने पैसे खाऊन पद्मावत सिनेमास अनुमती दिली आहे, असा आमचा आरोप आहे. इस्लाम व ख्रिश्‍चन धर्माचा अपमान करणार्‍या सिनेमावर त्वरित बंदी घातली जाते, मग हिंदू धर्माचा जेव्हा अपमान होतो तेव्हा सेन्सॉर बोर्ड व केंद्र सरकार काहीच करत नाही, फक्त चित्रपटाचे नाव बदलून हिंदूची दिशाभूल केली जात आहे, असे अजय सेंगर सिंह यांनी सांगितले. हिंदूच्या गौरवशाली इतिहासास कलंक लागू देणार नाही, राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये हा चित्रपट चालू देणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली नसल्याने आम्ही हे पाऊल उचलले,  असे राजपूत महामोर्चाचे अजयसिंह  सेंगर यांनी सांगितले. अमित चौव्हान यांनी म्हटले की, पद्मावत प्रदर्शित झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते.  या मोर्चात   महाराणा प्रताप बटालियन, हिंदूराष्ट्र सेना, महाराणा बिग्रेड, अ.भा. क्षत्रिय महासभा, राष्ट्रीय करनी सेना, हिंदू सेना, हिंदू महासभा, महाकाल सेना, राजस्थान राजपूत परिषद, सहभागी झालेल्या होत्या.