Thu, May 23, 2019 20:28
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा होणारच

विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा होणारच

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 35 ट्रेडच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यावर विद्यार्थ्यांची मागणी डावलून शुक्रवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आता परीक्षा होणार आहे. आयटीआयच्या पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी केली होती. कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक ऑनलाइन परीक्षा घेण्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती असून, ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी गेल्या आठवड्यात केली होती.

तरीही राज्यात प्रायोगिक तत्वावर फक्त जिल्हा स्तरावर 35 व्यवसायाची पहिल्या सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. आवश्यक  तिथे तोंडी परीक्षा  व ऑनलाईन परिक्षेबाबत मार्गदर्शन सर्व सबंधित विद्यार्थ्यांना 16 फेब्रुवारी पर्यंत औधोगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक कालावधी देण्यात आलेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता संचालनालय घेत आहे.

यापुढें सर्व स्तरावर सर्व सत्रासाठी व सर्व व्यवसायाची ऑनलाईन परीक्षा सर्व सोयी सुविधांचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.  व्यवसायाची ऑनलाईन परीक्षा फक्त जिल्हा परीक्षा केंद्रांवरील फक्त 22 हजार विद्यार्थ्यांची आवश्यक सोयी सुविधा असणार्‍या ऑनलाईन परिक्षा केंद्रावर 17 ते21 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. असे संचालक अनिल जाधव यांनी माहिती देताना सांगितले.