Sat, Nov 17, 2018 10:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या; नारायण राणेंचा इशारा

सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या; राणेंचा इशारा

Published On: Jan 20 2018 2:12AM | Last Updated: Jan 20 2018 2:12AMमुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष काढणारे नारायण राणे यांना भाजपाकडून मंत्रिपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. आमदारकीचा राजीनामा देऊन चार महिने झाले तरी त्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. यामुळे राणे कमालीचे अस्वस्थ झाले असून शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या, असा इशारा भाजपा नेतृत्वाला दिला.  विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर स्वत:चा पक्ष काढणार्‍या राणे यांनी लगेचच भाजपाप्रणीत एनडीएमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राणे यांना भाजप कोट्यातून राज्यात मंत्री करणार असल्याचे अनेक वेळा सांगितले.

मात्र प्रत्यक्ष पुढे काहीच हालचाल होताना दिसत नाहीत. यामुळे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या राणे यांचा संयम आता सुटू लागला आहे. कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान भाजपाने तुम्हाला देऊ केलेल्या मंत्रिपदाचे पुढे काय? असे विचारले असता. सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे राणे म्हणाले.