Wed, Jul 08, 2020 06:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चक्रीवादळात काय करावे अन् काय करु नये? 

चक्रीवादळात काय करावे अन् काय करु नये? 

Last Updated: Jun 03 2020 1:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी आणि मुंबईला जवळपास सव्वाशे वर्षानंतर चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. निसर्ग हे चक्रीवादळ काही वेळातच अलिबागच्या जवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारने या वादळाचा इशारा दोन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर कोकण आणि मुंबईतील स्थानिक प्रशासनाने या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाची तीव्रता किनाऱ्याकडे सरकताना वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आणि 110 किमी वेगाचे वारे वाहतील असाही इशारा दिला आहे. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने या काळात नागरिकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही. याची माहिती दिली आहे. 

हे करावे 

- चक्रीवादळासंदर्भात काही प्रश्न असतील तर 1916 या नंबरवर कॉल करुन 4 नंबरचे बटन दाबा

- घरीच रहा, मोबाईल आणि पॉवर बँक पूर्ण चार्ज करुन ठेवा.

- टॉर्च, आपत्कालिन लाईच चार्ज करुन ठेवा, मेणबत्त्या खरेदी करुन ठेवा

- विद्युत उपकरणे, विद्युत पुरवठा करणारे स्विच गॅस पुरवठा बंद करुन ठेवा

- महत्वाची कागदपत्रे प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा.

- खिडकीपासून दूर रहा, खिडक्या बंद करुन त्याच्यावर दाब राहिल अशी वस्तू ठेवा

- खोलीच्या मध्यभागी थांबा,

- मजबूत फर्निचरच्या खाली सुरक्षित रहा

- आपत्कालिन  परिस्थिती आपले डोके आणि मान वाचवण्यासाठी आपल्या हाताचा वापर करा.

- विद्युत पुरवठा बंदच ठेवा

- जर गॅस लिक झाल्याचा वास आला तर त्वरित खिडत्या उघडा आणि घरातून बाहेर पडा 

हे करु नये

- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, शांत रहा

- चक्रीवादळाच्या काळात चार चाकी, दुचाकी चालवण्याचे टाळा

- पडझड झालेल्या इमारतीपासून दूर रहा

- जखमी लोकांना अत्यंत आवश्यक नसेल तर हलवू नका

- कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ, तेल सांडू नका, सांडलेच तर त्वरित साफ करुन घ्या