Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित पवार यांची राम कदम यांच्या वक्तव्यावर टीका

अजित पवारांची राम कदम यांच्या वक्तव्यावर टीका

Published On: Sep 05 2018 4:15PM | Last Updated: Sep 05 2018 9:47PMमुंबई : प्रतिनिधी 

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमावेळी केलेल्‍या वक्‍तव्यावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचा नाव घेत नाही. त्‍यांच्या या वक्‍तव्याला विरोधी पक्षातील नेत्‍यांनी विरोध केला आहे. 

आज राष्‍ट्रवादीच्या अजित पवार यांनी कदम यांच्या वक्‍तव्यांचा निषेध केला आहे. यावेळी बोलताना त्‍यांनी भाजपाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत आहेत. मुलींना काही त्यांचे अधिकार आहेत की नाहीत? मुलांना ज्याप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसाच मुलींना सुद्धा आहे. मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ ही कुठली भाषा? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? ही घमेंडशाही म्हणायची का? हा भाजपाच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का? असा समाचार घेतला. 

तसेच  चूक झाली तर भारतीय संस्कृतीमध्ये माफी मागण्याची पद्धत आहे. मात्र साधा खेदही व्यक्त केल्याचे दिसले नाही याचा मी निषेध व्यक्त करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.