Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो ३ च्या रात्रीच्या कामावरील स्थगिती कायम

मेट्रो ३ च्या रात्रीच्या कामावरील स्थगिती कायम

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 12:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

 सिप्झ ते कुलाबा या मेट्रो-3 प्रकल्पाच्या दरम्यान रात्रीवेळी काम केल्याने निर्माण होणार्‍या समस्यांवर रहिवाशी आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात तोडगा निघाला नसल्याने अखेर उच्च न्यायालयाने रात्रीच्या कामावरील स्थगिती कायम कायम ठेवली. मुख्य न्यायमूर्ती मंजूळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्याखंडपीठाने मेट्रो संदर्भात स्थापन केलेल्या न्यामूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या समितीकडे दाद मागण्याचे निर्देश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिले.

दिवस रात्र सुरू असलेल्यस मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामामुळे झोपमोडी बरोबरच ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील 50 वर्षीय रॉबिन जयसिंघानी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने मेट्रोला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत काम करण्यास मनाई केली. 

न्यायालयाच्या या आदेशामुळे अडचणीत सापडलेल्या एमएमआरसीएलने अर्ज दाखल करूनही स्थगिती उठवावी अशी विनंती केली आहे. त्यावर न्यायमूर्ती मंजूुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने यावर रहिवाशांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याचा सल्ला एमएमआरसीएला दिला होता. मात्र त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर तिन दिवसासाठी दोन तास रात्री 12 पर्यंत न्यायालयाने स्थगिती उठविली होती. मात्र या स्थगितीबाबत खंडपीठाने आज कोणताही निर्णय न देता या प्रश्‍नावर न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या समितीकडे दाद मागण्याचे निर्देष दिले.