Sun, Sep 23, 2018 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मानखुर्दच्या मंडालामध्ये गोदामाला भीषण आग (व्हिडिओ)

मुंबई : मानखुर्दच्या मंडालामध्ये गोदामाला भीषण आग (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मानखुर्दच्या मंडाला येथील कुर्ला स्क्रॅप मार्केट मधील एका गोदामाला आज दुपारी 2 च्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामामध्ये खराब तेलाचा साठा असल्याने आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, त्यामुळे आजूबाजूचे काही गोदामेही जळून खाक झाली.

या घटनेची माहिती अग्‍निशमन दलाला मिळताचं अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल  झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वर्षातून 2 ते 3 वेळा या ठिकाणी आग लागत असल्यामुळे ही आग लावली जाते की लागते असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान या आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूराचे लोट पसरले होते.