Sun, Apr 21, 2019 14:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने तरुणाची आत्महत्या

बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने तरुणाची आत्महत्या

Published On: Feb 12 2018 5:23PM | Last Updated: Feb 12 2018 5:22PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने मानसिक धक्का बसलेल्या एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कफ परेड भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे शुक्रवारी रात्री चौघांनी कासिम शेख या तरुणाला बाजारपेठेच्या जवळ मारहाण केली. मारहाण करणाऱ्यापैकी एक जण स्वत:च्या बुटावर थुंकला आणि कासिमला बुट चाटण्यास लावले. या चौघांपासून कासिमने कशी तरी स्वत:ची सुटका करून घेतली. 

सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे कासिमला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याने राहत्या घरी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. कासिमने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत मारहाण करणाऱ्या चौघांची नावे लिहली आहेत. 

याप्रकरणी पोलिसांनी इस्माइल शेख (४७), कारिया पावसे (३५), अफजल कुरेशी (४४) आणि अकबर शेख (३५) या चौघांना अटक केली आहे. या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे)नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.