Thu, May 23, 2019 05:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समृद्ध महाराष्ट्रात मुले मात्र कुपोषित

समृद्ध महाराष्ट्रात मुले मात्र कुपोषित

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:28AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

36% बालकांचे वजन कमी 2015-16 चा जो अहवाल तयार करण्यात आला आहे त्यानुसार राज्यात  बुटकेपणाचे प्रमाण हे 34.4 टक्क्याने वाढले आहे. तर लुकडेपणाचे प्रमाण हे 25 . 6 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचबरोबर अतीतिव्र लुकडेपणातही 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमी वजनाची मुले जन्माला येण्याचे प्रमाण हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 36 टक्क्यांनी वाढले असून ते चिंता वाढविणारे आहे. प्रोटीन्सयुक्त आहाराची  गरज  कमी वजनाची बालके तसेच लुकडेपणा टाळायचा असेल  तर प्रोटीन्सयुुक्त आहाराची गरज असल्याचे आहारतज्ञ  डॉ. फातिमा छत्रीवाला यांनी सांगितले. ही सगळी समस्या  साधारणपणे कनिष्ठ मध्यमवर्गिय समाजातून दिसून येते. मूळ समस्या ही चौरस आहाराची आहे. तो आहार घेणे व  गर्भधारणेच्या काळात आहाराची विशेष काळजी घेणे हाच  यावरील उपाय असल्याचे त्या म्हणाल्या.

औद्योगिक व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या व जगभरातून येणारी सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणार्‍या महाराष्ट्रात  पाच वर्षाखालील बालके मात्र कुपोषितच आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेेने हे  वास्तव समोर आले आहे. या अहवालाने सातत्याने प्रगतीचा उंचावणारा आलेख मांडणार्‍या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे तीन टप्प्यात देशभर केला जातो. त्यातून येणार्‍या आकडेवारीचा  उपयोग आरोग्य व कुटुंब कल्याणाच्या योजना देशभर राबविण्यासाठी केला जातो. मात्र याच अहवालातून जे वास्तव समोर आले आहे ते गंभीर व भावी पिढीसाठी विचार करायला लावणारे आहे. गेल्या काही वर्षात राज्यात या कुपोषणाच्या समस्येने लुकडेपणाचे प्रमाण वाढल्याचे वास्तव समोर आले आहे. 

महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण 48 टक्के 

भावी पिढीला ज्यांनी जन्म द्यायचा त्या प्रजनन वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये म्हणजे साधारणपणाने 15 ते 49 वर्षे या वयोगटातील महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण हे 23.5 टक्के एवढे मोठे आहे.त्यामध्येही रक्तक्षयाचे प्रमाण हे 48 टक्के एवढे भयावह असुन बालकांमधील कुपोषणाचे तेच मोठे कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  केवळ 6 टक्के बालकांना चौरस आहार पाच वर्षाखालील अर्भक व बालकांच्या स्तनपान व त्यांना दिल्या जाणार्‍या पूरक आहारातील त्रुटींवरही या अहवालात नेमके बोट ठेवण्यात आले आहे. 6 ते 23 महिने या वयोगटातील बालकांना पूरक आहाराची गरज  असते मात्र  केवळ 6 . 5 टक्के बालकांनाच चौरस आहार दिला जात असल्याचे आढळले  आहे. ही पोषण स्थिती तातडीने बदलण्याची शिफारसही अहवालात  करण्यात आली आहे. 

शहरी विकासाचा बुरखाही फाटला

राज्यात 48 टक्के शहरीकरण झाल्याचे अभिमानाने सांगितले जात असले तरीही शहरातही बालकांचे आरोग्य  बरोबर नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या संस्थेने शहरी पोेषण सवेर्र्क्षण अहवालही सादर केला आहे. शहरी भागात पाच वर्षाखालील बालकांचे बुटकेपणाचे प्रमाण हे 36.4 टक्के एवढे आहे. तर 30.7 टक्के बालके ही कमी वजनाची आहेत.