Sat, Sep 22, 2018 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुमेरा शेखचा धक्कादायक विजय

हुमेरा शेखचा धक्कादायक विजय

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:11AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

तेलंगणाच्या सहाव्या मानांकित हुमेरा शेखने तमिळनाडूच्या दुस-या मानांकित साई समहिताला सरळ सेटमध्ये नमवित अनिरुद्ध देसाई अखिल भारतीय टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीतील सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद केली. जुहु विलेपार्ले जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये हुमेराने साई समहितावर 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली.

सामन्यातील पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर दुस-या सेटमध्ये साई समहिताने चांगले आव्हान दिले पण, हुमेराने आपला खेळ उंचावत विजय मिळवला.  मिहिका यादवने भुवाना कालवाचा 6-3, 7-5 असा पराभव केला. तर, महक जैनने आठव्या मानांकित निधी चिलुमुलावर 6-1, 6-2 असा विजय मिळवत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.