Sat, Feb 23, 2019 16:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हनीमूनचा अनुभव विद्यार्थिनींना सांगणे पडले महागात

हनीमूनचा अनुभव विद्यार्थिनींना सांगणे पडले महागात

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी 

नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींशी हनीमून आणि सेक्ससंबंधी स्वत:चा अनुभव शेअर करणे एका प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले. राज्य सरकारच्या अखत्यारितील असलेल्या नर्सिंग कॉलेजच्या या प्राध्यापकाला कनिष्ठ न्यायालयाने विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले. रमेश बांद्रे असे या 45 वर्षाच्या प्राध्यापकाचे नाव आहे.

नर्सिग कॉलेजमध्ये अध्यापन करणारे प्राध्यापक बांद्रे हे वर्गात आल्यानंतर आपले वैवाहिक आयुष्यातील सेक्ससंबंधीचे अनुभव कथन करतात. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री महिलांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, हनीमूनचा आनंद कशाप्रकारे लुटला जातो, याची माहिती देत ते विद्यार्थिनींशी सेक्ससंबंधी चर्चा करण्यास प्राधान्य देतात. तसेच स्वत:चे लैंगिक जीवनातील अनुभव लिहिलेली पर्सनल डायरी सक्तीने वाचावयास सांगत असे़, असा आरोप करून एका विद्यार्थिनीने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. 

कॉलेज प्रशासनाने याची दखल घेेऊन कॉलेजच्या प्रशासनाने वारंवार ताकीद दिली. मात्र त्यांच्याच काहीच बदल झाला नाही. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणाची  गंभीर दखल कनिष्ठ न्यायालयाने घेतली. प्राध्यापकाने सेक्सचा विषय जर सभ्य पद्धतीने शिकवला, तर त्यात अपवित्र वा सभ्यता-नैतिकतेच्या विरोधात काहीच नाही. मात्र विद्यार्थिनीला स्वत:चे लैंगिक जीवनातील अनुभव लिहिलेली पर्सनल डायरी सक्तीने वाचावयास सांगणे हे विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाला धक्का  आहे, असे स्पष्ट करून प्राध्यापक रमेश बांद्रे यांना न्यायालयाने दोषी ठरविले.