होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पतीला छळणाऱ्या पत्नीला ५० हजारांचा दंड, पतीची अखेर सुटका

पतीला छळणाऱ्या पत्नीला ५० हजारांचा दंड, पतीची अखेर सुटका

Published On: May 01 2018 12:26PM | Last Updated: May 01 2018 12:36PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई उच्च न्यायालयाने एक अनोखा निवाडा केला आहे.  न्यायालयाने पत्नीने पती आणि त्यांच्या घरच्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याप्रकरणी पत्नीपासून घटस्फोट आणि पतीच्या घरच्यांचा छळ केला म्हणून ५० हजार दंड ठोठावला. 

न्यायमूर्ती कमलकिशोर आणि न्यायमूर्ती कोलाबावाला यांच्या बेंचने फॅमिली कोर्टाचा पतीला घटस्फोट नाकारुन पत्नीला १५ हजार उदरनिर्वाहासाठी देण्याचा निर्णय रद्द केला. उच्च न्ययालयाने पतीला घटस्फोट न देण्याच्या फॅमिली कोर्टाचा निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. 

या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारी घटना पतीच्या डॉक्टर असलेल्या भावाविरूध्द घडली. पत्नीने पतीच्या भावाविरूध्द विनयभंगाची केस दाखल केली होती. पण ज्यावेळी ही घटना घडल्याचा दावा पत्नीने केला होता त्यावेळी पतीचा भाऊ जामीनासाठी सत्र न्यायालयात आला होता. त्यामुळे ही केस मागे घेतली होती.