Mon, Nov 19, 2018 23:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाला धोरणाचा मुहूर्त सापडला!

फेरीवाला धोरणाचा मुहूर्त सापडला!

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

फेरीवाल्यांसंबंधीच्या धोरणाचा अखेर पालिकेला मुहूर्त सापडला. याचा श्रीगणेशा म्हणून फेरीवाला धोरण निश्‍चित करण्यासाठी पालिकेने नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पालिका परिमंडळनिहाय सात समित्या नेमण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

  पालिकेच्या 7 परिमंडळीय क्षेत्रांसाठी 7 स्वतंत्र नगर पथविकास समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्याशिवाय पथविक्रेत्यांच्या प्रतिनिधींव्यतिरिक्त अन्य सदस्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) योजना-2017 मधील विविध तरतुदींनुसार नमूद केलेल्या प्रवर्गातील संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले आहेत. यासाठी 19 डिसेंबर 2017 पर्यंत परिमंडळीय उपायुक्तांकडे अर्ज करणे आवश्यक असल्याचे पालिकेचे अनुज्ञापन अधीक्षक शरद बांडे यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक परिमंडळ