Tue, Mar 19, 2019 09:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर लाईन बोरिवलीपर्यंत

हार्बर लाईन बोरिवलीपर्यंत

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:56AM

बुकमार्क करा
मुंबई : खास प्रतिनिधी

मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा अधिकाधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्गासह विरार-गोरेगाव उन्नत रेल्वेमार्गांच्या कामाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या बैठकीत घेण्यात आला.  पनवेल- कर्जत दरम्यान आणखी एक अतिरिक्त रेल्वे मार्ग टाकला जाणार असून डोंबिवली, कल्याण तसेच लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घाटकोपर, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, भांडुप, वडाळा रोड, सायन, जीटीबी नगर, चेंबूर, शहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या  अतिगर्दीच्या रेल्वेस्थानकांवरील गैरसोयी हटवून त्यांची स्थिती सुधारावी अशी विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. 

रेल्वेच्या हद्दीत असलेल्या घरांमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याने अशा झोपड्या हटवून त्यांना पर्यायी घरे देण्याबाबतही विचार झाल्याचे फडणवीस म्हणाले. या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटल्यास रेल्वेची बरीच जागा मोकळी होणार असून  ती विकासासाठी वापरता येणार आहे. हा निर्णय आधीच झाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्यासाठी राज्य सरकारने सुचविलेल्या विविध